वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पो आयशर ट्रकची समोरा समोर जोरदार धडक

Foto
दोघांचा मृत्यू तर २१ जण जखमी

वैजापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर महामार्गावर घायगाव शिवारात वन्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोची व आयशर ट्रकची सोबत समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघातानंतर वैजापूर पोलिस व याच महामार्गाने जाणाऱ्याच्या तुकडीने जखमींना मदतकार्य सुरू केले.

या अपघातात अनिता वाघ (वय ३५ वर्षे रा. पाटेगाव ता. पैठण) ज्ञानेश्वर वाघ (वय १९ रा पैठण) हे दोघे मृत झाले. तर २१ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी जेसीबी व टोविंग कारच्या सहाय्याने टेम्पोच्या चालेल्या भागातून फसलेल्या प्रवाश्याना काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. मात्र अडथळा येत असल्याने वैजापूर पोलिस ठाण्याचे जटाळे व काळे या कर्मचाऱ्यांनी तातडीने समृद्धी महामार्गावरील रेस्क्यू टीमला संपर्क साधला परिसरातील नागरिक व एस आरपीएफ पोलीस यासोबतच वैजापूर पोलीस यांनी देवदूत बनत शर्तीच्या प्रयत्नानंतर फसलेल्या जखमींना बाहेर काढण्यात यश आले.
दरम्यान जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून टेम्पोत २१ अधिक प्रवासी
 असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे पैठणहून येवला येथे लग्नासाठी जात होते जखमींना रुग्णवाहिका चालक शुभम गायकवाड राहुल पेहरकर अल्ताफ शेख, सचिन गायकवाड, महेश बुणगे, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, उपनगराध्यक्ष शेख रियाज शेख अकील, पप्पु लांडे यांनी तत्काळ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी यांनी मदतकार्य केले. घायगाव शिवारात वन्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पो (क्र. एम. एच. २० इ. जी ०१५८) व आयशर ट्रक (क्र. जी जे २७ टी इ ५५३५) सोबत समोर समोर धडक होऊन भीषण अपघात घडला. 

या अपघातानंतर वैजापूर पोलिस व याच महामार्गाने जाणाऱ्याच्या तुकडीने जखमींना मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी जेसीबी व टोविंग कारच्या सहाय्याने टेम्पोच्या चेपलेल्या भागातून फसलेल्या प्रवाश्यांना काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. मात्र अडथळा येत असल्याने वैजापूर पोलिस ठाण्याचे जटाळे व काळे या कर्मचाऱ्यांनी तातडीने समृद्धी महामार्गावरील रेस्क्यू टीमला संपर्क साधला परिसरातील नागरिक व एस आरपीएफ पोलीस यासोबतच वैजापूर पोलीस यांनी देवदूत बनत शर्तीच्या प्रयत्नानंतर फसलेल्या जखमींना बाहेर काढण्यात यश आले. 

दरम्यान जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून टेम्पोत २० हुन अधिक प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे.

हे पैठणहून येवला येथे लग्नासाठी जात होते जखमींना रुग्णवाहिका चालक शुभम गायकवाड राहुल पेहरकर अल्ताफ शेख, सचिन गायकवाड, महेश बुणगे यांनी मदतकार्य केले. येथील वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमीक उपचारानंतर असुन गंभीर जखमींना संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 

जखमीची नावे पुढीलप्रमाणे सर्व जखमी पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील असून जखमींची पुढील नावे प्रमाणे गणेश जाधव, अजय वाघ, विशाल जाधव, किसान वाघ, रंजीत वाघ, जयसिंग वाघ, राम वाघ, ज्ञानेश्वर वाघ, जितेंद्र वाघ, शालिनी सोनवणे, सिद्धू वाघ, अनिल वाघ, कैलास वाघ, चेतन वाघ, सुनील वाघ, सोन्या वाघ, संतोष वाघ, अजय सोनवणे, अनिता वाघसह दोन अनोळखी पुरुष असे २१ जण जखमी झाले आहेत. या जखमींना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर घाटी येथील रुग्णालयात पाठवलेले आहे. जखमींवर वैजापूर येथील वैद्यकीय अधिकारी. यांनी प्राथमिक उपचारानंतर त्याना संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.